मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 08, 2024 12:24 AM IST

PDCC Bank Baramati Constituency : बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही विनाकारण रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पीडीसीसी बँक वेल्हे शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

PDCC Bank : पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय… आत्ता रात्रीचे बारा वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा .. निवडणूक आयोग दिसतंय ना? सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल," अशा आशयाची पोस्ट करत त्याखाली पीडीसीसी बँक वेल्हे शाखेचा फोटो आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर याची चौकशी करत बँकेच्या व्यवस्थापकाविरोधात आचारसंहित उल्लंघनाचा (Violation of code of conduct) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वेल्हे तालुक्यातील भरारी पथकाचे प्रमुख रमेश आजिनाथ बेलेकर, कृषी सहायक वेल्हे कृषी विभाग यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर या प्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक तेलावडे असे गुन्हा दाखल झालेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. वेल्ह्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी याबाबात माहिती दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार यांनी ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती वेल्हे शाखा बँक सुरू असल्याची पोस्ट केली होती. त्यानुसार आज मंगळवार(दि. ७ मे) रोजी सकाळी वेल्हे तालुक्यातील फिरते भरारी पथकाचे पथक प्रमुख रमेश आजिनाथ बेलेकर, बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यानंतर बँकेमध्ये सीसीटीव्ही फुटेज नुसार काल सोमवार(दि. ६ मे) रोजी बँकेच्या कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतर बँकेमध्ये ४० ते ५० व्यक्ती संशयास्पद स्थितीत संचालक यांच्या केबिनजवळ ये-जा करत असल्याचे दिसून आले.

बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही विनाकारण रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर करीत आहेत.

त्यानंतर रोहित पवारांनी आणखी एक सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले की,विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीतमात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ.. तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही. अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल.

IPL_Entry_Point