मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 07, 2024 11:58 PM IST

Haryana News : हरियाणातील तीन आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला समर्थन जाहीर केले आहे. यामुळे सरकार अल्पमतात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात तीन अपक्षांनी सोडली साथ
हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात तीन अपक्षांनी सोडली साथ

हरियाणात मंगळवार अचानक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली. तीन पक्ष आमदारांनी भाजप सरकारचा (haryana government) पाठिंबा मागे घेतला. यामध्ये पुंडरीतील आमदार रणधीर गोलन, नीलोखेडीचे धर्मपाल गोंदर आणि चरखी दादरीचे आमदार सोमवीर सांगवान यांचा समावेश आहे. या तिघांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला आपले समर्थन दिले आहे. त्यानंतर काँग्रेसने दावा केला की, बीजेपी सरकार अल्पमतात आले आहे. दुसरकीकडे भाजपने म्हटले आहे की, चिंतेचे कारण नाही.

ट्रेंडिंग न्यूज

तीन आमदारांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान यांच्या उपस्थितीत रोहतकमध्ये एक पत्रकार परिषद घेत पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत व काँग्रेसला समर्थन देत आहोत. शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यावरून आम्ही हा निर्णय घेतला आहे. 

१२ मार्च २०२४ रोजी नायब सिंह सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली होती. तर १३ मार्च रोजी भूपेन्द्र सिंह हुड्डा यांच्याकडून अविश्वास प्रस्ताव  सादर केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, काँग्रेस काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी व इच्छेशी काही देणेघेणे नाही.

भाजपकडे आता ४० आमदार, काँग्रसचा दावा -

प्रदेश काँग्रेस प्रमुख उदय भान यांनी दावा केला की, तीन अपक्ष आमदार सोमबीर सांगवान, रणधीर सिंह गोलेन आणि धर्मपाल गोंदर यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. ९० सदस्यीय हरियाणा विधानसभेत सध्या एकूण आमदारांची संख्या ८८ आहे. त्यामध्ये भाजपकडे ४० सदस्य आहेत. भाजप सरकारला आधी जेजेपी पक्षाचा व अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता. मात्र आता अपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले आहे. 

भाजप सरकार संकटात?

आता प्रश्न उपस्थित होतो की. तीन आमदारांनी समर्थन काढून घेतल्याने हरियाणा सरकार अल्पमतात आले आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. कारण भाजपकडे अजूनही ४५ आमदारांचे समर्थन आहे. त्यमध्ये ४० आमदार भाजपचे तर ५ अपक्षांचा समावेश आहे. दुसरा प्रश्न आहे की, तीन अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने काँग्रेसकडे सरकार स्थापन करण्याची संधी आहे का? याचे ही उत्तर सध्या नाही असेच आहे. कारण काँग्रेसकडे ३० आमदार आहेत. त्यात ३ आमदारांची भर घातल्यास ही संख्या ३३ होते. तसेच जेजेपीचे १० आमदार काँग्रेससोबत येणार नाहीत. आणि जरी ते आले तरी त्यांची आमदार संख्या ४३ होते.

IPL_Entry_Point