मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  किती आनंदी आनंद… मुंबईतील झोपडीधारकांना मिळणार अवघ्या अडीच लाखांत घर

किती आनंदी आनंद… मुंबईतील झोपडीधारकांना मिळणार अवघ्या अडीच लाखांत घर

May 25, 2023, 06:04 PM IST

  • Shinde Fadnavis govt : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं सर्वसामान्यांना खूश करण्याचा धडाकाच लावला आहे.

Devendra Fadnavis - Eknath Shinde (HT_PRINT)

Shinde Fadnavis govt : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं सर्वसामान्यांना खूश करण्याचा धडाकाच लावला आहे.

  • Shinde Fadnavis govt : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं सर्वसामान्यांना खूश करण्याचा धडाकाच लावला आहे.

Mumbai Slum dwellers to get home : महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनं सर्वसामान्यांना खूश करण्याचा धडाकाच लावला आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या धर्तीवर नमो सन्मान योजना व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता सरकारनं शहरातील गरिबांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील झोपडीधारकांना अवघ्या अडीच लाखांत घर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ; ७ जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा

या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीतील झोपडीधारकांना निर्धारित शुल्क भरून घर मिळणार आहे. राज्य सरकारनं पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या निर्णयामुळं झोपडपट्टींच्या जागांचा विकास होण्याबरोबरच गरिबांच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे.

Mumbai: मुंबईकर अवघ्या २० मिनिटांत नवी मुंबई गाठणार; 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज' जवळपास पूर्ण

अटी-शर्ती लागू

झोपडीधारकांना अडीच लाखांमध्ये घर मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. या अटी व पात्र लाभार्थींसाठीचे निकष ठरविण्याची जबाबदारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

राजकीय फायद्याचा निर्णय?

शिंदे फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महापालिकेची सूत्रे गेल्या सव्वा वर्षापासून प्रशासकाच्या हाती आहेत. महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते. मुंबई महापालिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून काढून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. अडीच लाखांत घर देण्याचा हा निर्णय भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडू शकतो, असं बोललं जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा