मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईकर अवघ्या २० मिनिटांत नवी मुंबई गाठणार; 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज' जवळपास पूर्ण

Mumbai: मुंबईकर अवघ्या २० मिनिटांत नवी मुंबई गाठणार; 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज' जवळपास पूर्ण

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 25, 2023 04:30 PM IST

India's longest bridge: मुंबईतील समुद्रावरील देशातील सर्वात मोठा पुल लवकरच वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे.

Mumbai Trans Harbour Link Bridge
Mumbai Trans Harbour Link Bridge

Mumbai Trans Harbour Link Bridge:  मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज' शहराला नवी ओळख देण्यासाठी सज्ज झाला आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यापासून लोकांसाठी सुरू होणारा हा पूल समुद्रावर बांधलेला देशातील सर्वात मोठा पूल असेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.

'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज'मुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मुंबईहून नवी मुंबईत पोहण्यासाठी प्रवाशांना अवघ्या २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. सध्या प्रवाशांना मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी दोन तास घालवावी लागतात.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज हा २२ किलोमीटरचा आहे. या पुलाचे बांधकाम करताना अनेक समस्या उद्भवल्या. या पुलाच्या सुरक्षितेसाठी आणि पर्यापरणाला धोका पोहोचवू नये, याकडे म्हाडाने विशेष लक्ष दिले आहे. समुद्रात सुमारे १६ किलोमीटरच्या परिसरात ज्या ठिकाणी हा पूल बांधण्यात आला आहे, तिथे गेल्या वर्षांपासून प्लेमिंगो पक्षी येत असतात, जे मुंबई, नवी मुंबई आणि मुंबईच्या शिवडी परिसराची ओळख आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या पक्ष्यांना कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.

मुंबईतील समुद्रावर बांधण्यात येत असलेल्या या सर्वात लांब पुलाच्या पॅकेज वन आणि पॅकेज टूला जोडण्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी या पुलाची पाहणी केली.

IPL_Entry_Point

विभाग