मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sikandar Sheikh : सिकंदरची विजयी आगेकूच सुरूच; पुन्हा पंजाबच्या मल्लाला हरवत ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी

Sikandar Sheikh : सिकंदरची विजयी आगेकूच सुरूच; पुन्हा पंजाबच्या मल्लाला हरवत ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी

Jan 25, 2023, 10:16 AM IST

  • Sikandar Sheikh : महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे चर्चेत आलेला सिकंदर शेख यांची विजयी आगेकूच सुरूच आहे. विसापूर केसरी नंतर आता भीमा केसरीचा मानकरी सिकंदर ठरला आहे. त्याने पुन्हा पंजाबच्या मल्लाला नमवत हा खिताब मिळवला आहे.

Sikandar Shaikh

Sikandar Sheikh : महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे चर्चेत आलेला सिकंदर शेख यांची विजयी आगेकूच सुरूच आहे. विसापूर केसरी नंतर आता भीमा केसरीचा मानकरी सिकंदर ठरला आहे. त्याने पुन्हा पंजाबच्या मल्लाला नमवत हा खिताब मिळवला आहे.

  • Sikandar Sheikh : महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे चर्चेत आलेला सिकंदर शेख यांची विजयी आगेकूच सुरूच आहे. विसापूर केसरी नंतर आता भीमा केसरीचा मानकरी सिकंदर ठरला आहे. त्याने पुन्हा पंजाबच्या मल्लाला नमवत हा खिताब मिळवला आहे.

Sikandar Sheikh news : महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे चर्चेत आलेल्या सिकंदर शेखने त्याची विजय घोडदौड सुरच ठेवली आहे. विसापूर केसरी नंतर त्याने सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या भीमा केसरी स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. सिकंदर ने पंजाबच्या मल्लाला धूळ चारत भीमा केसरीवर आपले नाव कोरले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरूष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर हा कुसत्यांचा आखाडा रंगला. तब्बल पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. भीमा केसरीसाठी राज्य तसेच राज्याबाहेरून जवळपास ४०० पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नावे नोंदवली होती. तब्बल ९ लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या गेल्या.

भीमा केसरीत अनेक महत्वाच्या कुस्त्या झाल्या. यातील ५ लढतींनी सर्वाचे लक्ष वेधले. भीमा केसरीसाठी शेवटची लढत ही सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात झाली. सिकंदरने पंजाबचा सहा फूट उंच आणि धिप्पाड असा भूपेंद्रसिंह अजनाला नमवले. सुरुवातीला भूपेंद्रने सिकंदर याच्यावर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सिकंदरने आपला अस्सल मातीतील खेळ दाखवत भूपेंद्रला चितपट करत 'भीमा केसरी' खिताब पटकावला.

तर, महेंद्र गायकवाडने पंजाब युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोरा अजनाला नमवले. महिंद्राने आपला नेहमीचा खेळ खेळत पंजाबच्या गोरा या मल्लाला उचलून चिटपट केलं

विभाग