मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील शिपायावर गुन्हा

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकावणाऱ्या मुंबई पोलीस दलातील शिपायावर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 17, 2023 06:32 AM IST

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील पोलीस शिपायाच्या विरोधात सोमवारी रात्री विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra Kesari Kusti 2023
Maharashtra Kesari Kusti 2023

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील पोलीस शिपायाच्या विरोधात सोमवारी रात्री पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस शिपाई संग्राम कांबळे, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रारअर्ज देण्यात आला होता. त्यानुसर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरूड येथे पार पडली. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले. होते. सातव यांच्या मोबाइल क्रमांकावर कांबळे याने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेख याच्याशी झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाड याला चार गुण बहाल केल्याचा आरोप करून धमकी दिल्याचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी तक्रार अर्जात म्हटले होते.

सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत पंच असलेल्या मारूती सातव यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती. सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाडला चार पॉइंट दिल्याने महाराष्ट्रभर या स्पर्धेबाबत वाद गाजत आहे. यामध्ये आपल्या मुलावर अन्याय झाल्याची भावना सिकंदरच्या वडिलांनी व्यक्त केली असून कोल्हापुरातील पैलवान व कुस्ती रसिकांनी सिंकदरवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, जर उपांत्यफेरीत पंचांनी पक्षपातीपणा केला नसता तर महाराष्ट्र केसरी विजेतेपदाचा निकाल वेगळाच लागला असता. त्याचबरोबर कोल्हापुरातील अनेक तालमीतील पैलवानांनी आरोप केला की, पुणेकरांनी आधीच ही स्पर्धा फिक्स केली होती. महाराष्ट्र केसरीचा विजेता शिवराज राक्षे ठरला असला तर सोशल मीडियावर सिंकदर शेख हिरो ठरला आहे.

महाराष्ट्र केसरीत मातीच्या अंतिम फेरीत सिकंदरविरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव वादात अडकले आहेत. आता मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी फोन करून धमकी दिल्याचा दावा सातव यांनी केली आहे.

याप्रकरणी सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार अर्जकेला असून कोथरूड पोलिसांतही तक्रार दिली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचांना धमकी देण्यात आली आहे.

यावर मारुती सातव यांनी म्हटले की, पंचाना धमक्या मिळू लागल्या तर निर्णय कसे द्यायचे, मागील २० वर्षापासून पंचाचे काम करत आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सातव यांनी म्हटले की, महेंद्रने खालची टांग हा डाव सिकंदरवर लावला होता आणि सिकंदरसुद्धा डेंजर झोनमध्ये गेला होता. त्यामुळे महेंद्रला चार गुण दिले.

IPL_Entry_Point

विभाग