मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : संजय राऊत यांना जेल की बेल?, आज कोर्टात होणार निर्णय!

Sanjay Raut : संजय राऊत यांना जेल की बेल?, आज कोर्टात होणार निर्णय!

Aug 22, 2022, 09:16 AM IST

    • Hearing on Sanjay Raut ED Custody : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते ई़डी कोठडीतच आहेत.
Hearing on Sanjay Raut ED Custody (Satish Bate/HT PHOTO)

Hearing on Sanjay Raut ED Custody : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते ई़डी कोठडीतच आहेत.

    • Hearing on Sanjay Raut ED Custody : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते ई़डी कोठडीतच आहेत.

Hearing on Sanjay Raut ED Custody : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी न्यायालयानं राऊतांना सुनावलेली कोठडी आज संपणार आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीत कोर्ट त्यांना बेल देणार की कोठडी कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

गोरेगावातील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊतांना एक ऑगस्टला तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयानं दोन वेळा जामीन नाकारत ईडी कोठडी कायम ठेवली होती. त्यामुळं आता तिसऱ्यांदा त्यांच्या जामीनावर कोर्टात सुनावणी होणार आहे.

त्याचबरोबर संजय राऊतांना अटक केल्यानंतर ईडीनं श्रद्धा डेव्हलोपर्सच्या कार्यालयांवरही छापेमारी केली होती. यात इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांसह महत्त्वाची कागदपत्रं ईडीनं जप्त केली होती. याशिवाय राऊत जी मर्सिडीज कार वापरत होते, ती देखील श्रद्धा डेव्हलोपर्सच्याच मालकीची असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं आता यांसंदर्भातीलही काही कागदपत्रं ईडी न्यायालयात सादर करणार का, याकडं सर्वांचं लक्ष आहे, कारण त्यामुळं संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रविण राऊत यांनी त्यांचे भाऊ संजय राऊत यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेचे काही आमदारही उपस्थित होते. त्याआधी प्रविण राऊत यांनी संजय राऊतांना भेटण्यासाठी परवानगी मागितली असता ती तुरुंग प्रशासनानं नाकारली होती. परंतु त्यानंतर तीन दिवसांनी संजय राऊतांना भेटीसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं आता कोर्टाच्या आजच्या सुनावणीत शिवसेना नेते संजय राऊतांना जामीन मिळणार की त्यांची ईडी कोठडी कायम ठेवली जाणार, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा