मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Jayanti 2023: शिवप्रेमींना सरकारची भेट.. शिवजयंतीला ‘शिवनेरी’कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी

Shiv Jayanti 2023: शिवप्रेमींना सरकारची भेट.. शिवजयंतीला ‘शिवनेरी’कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी

Feb 16, 2023, 11:51 PM IST

  • Toll exemption on the route to shivneri fort : शिवजयंती निमित्त शिवनेरी गडाकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

Toll exemption on the route to shivneri fort : शिवजयंती निमित्त शिवनेरी गडाकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

  • Toll exemption on the route to shivneri fort : शिवजयंती निमित्त शिवनेरी गडाकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे – १९ फेब्रुवारी रोजी देशभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त राज्यभरात व शिवनेरी किल्ल्यावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी  किल्ल्यावर येत्या रविवारी (१९ फेब्रुवारी) रोजी मोठ्या उत्साहात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. राज्य सरकारकडूनही शिवनेरीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरीवर दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील शिवप्रेमींना शिंदे सरकारने गिफ्ट दिले असून त्यादिवशी शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

शिवनेरीकडे जाणाऱ्या तिन्ही टोल नाक्यावर शिवजयतींनिमित्त वाहनांना सरकारने टोल न आकरण्याचे निर्देश दिले आहेत. 

खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन जाणाऱ्या वाहनांना शिवजयंतीच्या दिवशी टोलमाफी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात शिवभक्ती शिवनेरीवर जमणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शिवभक्तांसाठी हा निर्णय घेतला आहे.

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी  २०२३  रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त व त्यांच्या वाहनांची होणारी गर्दी पाहता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेशही जारी केले आहे.