मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MCA Elections : एमसीए निवडणुकीत मोठी उलथापालथ.. शरद पवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात!

MCA Elections : एमसीए निवडणुकीत मोठी उलथापालथ.. शरद पवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात!

Oct 10, 2022, 06:06 PM IST

    • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association elections) यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसेच शिंदे गट असे सर्व एकत्र येताना दिसणार आहेत. 
शरदपवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association elections) यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप,शिवसेना तसेच शिंदे गट असेसर्व एकत्र येताना दिसणार आहेत.

    • मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association elections) यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसेच शिंदे गट असे सर्व एकत्र येताना दिसणार आहेत. 

मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २० ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीत एकमेकांचे विरोधी गट असणारे शरद पवार (Sharad pawar) आणि आशिष शेलार (ashish shelar) आता संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत. मुख्य म्हणजे राज्यात विरोधात असणारे आशिष शेलार आणि शरद पवार यांचं संयुक्त पॅनल मैदानात असणार आहे. संदीप पाटील स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. आशिष शेलार हे शरद पवारांच्या पॅनलमधून निवडणूक लढत असतानाच मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील एमसीएच्या आखाड्यात उतरले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

आशिष शेलार व शरद पवार पॅनलमध्ये लढत होईल असे सांगितले जात होते, मात्र आता यामध्ये ट्विस्ट आला असून दोन विरोधी पॅनल एकत्र आले आहेत. मंत्री नसलेला कोणताही आमदार ही निवडणूक लढवू शकतो, त्यामुळे आशिष शेलार अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. तसंच न्यायालयाने वयाची अट घातल्यामुळे शरद पवार निवडणुकीच्या आखाड्यात थेट उतरू शकत नाहीत. मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी अपेक्स काऊन्सिलसाठी स्वतंत्र अर्ज भरला आहे. विहंग सरनाईक यांनी एमपीएल अर्थात मुंबई प्रीमियर लीगसाठी अर्ज दाखल केला आहे.

 

<p>एमसीएसाठी पवार शेलार एकत्र</p>

विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association elections) यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसेच शिंदे गट असे सर्व एकत्र येताना दिसणार आहेत. यावेळीआशिष शेलार अध्यक्षपदासाठी तर अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असूनसंयुक्त सचिव दीपक पाटील तर खजिनदारपदासाठी अरमान मलिकांना उमेदवारी दिली आहे. कार्यकारिणीत जितेंद्र आव्हाड,मिलिंद नार्वेकर,निलेश भोसले यांच्यासह९जण असणार आहेत. त्यामुळे विविध पक्षांचे नेते यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलमधून निवडणूक लढवणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा