मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हरिनामाच्या गजराने दुमदुमाला दिवे घाट; ज्ञानोबा माऊलींचा सोहळा सासवडला मुक्कामी

हरिनामाच्या गजराने दुमदुमाला दिवे घाट; ज्ञानोबा माऊलींचा सोहळा सासवडला मुक्कामी

Jun 24, 2022, 07:33 PM IST

    • Ashadhi wari 2022 पुण्यातील मुक्काम आटोपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी दिवे घाट सर करून सासवड मुक्कामी पोहचला. यावेळी हरिनामाच्या आणि विठू माऊलीच्या घोषणेने अवघा घाट दुमदुमला होता.
प्रसिद्ध दिवेघाट सर करताना संत ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा

Ashadhi wari 2022 पुण्यातील मुक्काम आटोपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी दिवे घाट सर करून सासवड मुक्कामी पोहचला. यावेळी हरिनामाच्या आणि विठू माऊलीच्या घोषणेने अवघा घाट दुमदुमला होता.

    • Ashadhi wari 2022 पुण्यातील मुक्काम आटोपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी दिवे घाट सर करून सासवड मुक्कामी पोहचला. यावेळी हरिनामाच्या आणि विठू माऊलीच्या घोषणेने अवघा घाट दुमदुमला होता.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala  हरिओम विठ्ठला, ज्ञानोबा-माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली, माऊली अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला. पुण्यातील गुरुवारचा मुक्काम आटोपल्यानंतरर ‘एवढा करा उपकार! देवा सांगा नमस्कार’ असे म्हणत शहरातील भक्तांनी पालखी सोहळ्याला साश्रू नयनांनी निरोप दिला. पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात हा घाट सायंकाळी ५ वाजता पार केला. रात्री ९ च्या सुमारास हा सोहळा सासवडला पोहचला. यावेळी सासवडकरांनी जल्लोषात या पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती. अवघड असा दिवे घाट टाळ मृदुगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात वारक-यांनी लिलया पार केला. शुक्रवारी पुण्यातील विश्रांतीनंतर शुक्रवारी मजल दरमजल करत हा सोहळा सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढीने पुढे जात होता.

 

<p>दिवे घाटातून पालखी येताच घाटात पालखीची वाट पाहणाऱ्या भावीकांनी हात उंच करून पालखीचे दर्शन घेतले.&nbsp;</p>

वडकी येथे पोहचल्यावर माऊलींना पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. हडपसर येथे विसावा घेतल्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण सुरू झाली. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले. पुण्यातील भक्तीसंगमानंतर संतश्रेष्ठ तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळा सकाळी पुण्यनगरीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला. ज्ञानोबा माऊलींची पालखी शुक्रवारी संत सोपानकाकांच्या नगरीत मुक्कामाला विसावली.