मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji raje : अन्य राज्ये देत असतील, तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही? संभाजीराजेंचा सरकारला सवाल

Sambhaji raje : अन्य राज्ये देत असतील, तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही? संभाजीराजेंचा सरकारला सवाल

Mar 23, 2023, 12:10 AM IST

  • Sambhaji raje Chhatrapati : इतर राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध करून देतात, तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केला आहे.

Sambhaji raje Chhatrapati

Sambhaji raje Chhatrapati : इतर राज्ये शेतकऱ्याला२४तास वीज उपलब्ध करून देतात, तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही?असा सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केला आहे.

  • Sambhaji raje Chhatrapati : इतर राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध करून देतात, तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केला आहे.

राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजूसह अन्य पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. आस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट सवाल केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

Weather Updates: कोकणच्या तापमानात वाढ; मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले की, शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? इतर राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज उपलब्ध करून देतात, तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा सवाल संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे सवाल केले आहेत.

संभाजीराजे म्हणाले, मी नुकतीच तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ते त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारक योजना राबवत आहेत. तेथे शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा केला जात आहे. त्यांच्याकडून शेतीविषयक धोरण समजून घेतले. त्यासाठीच मी त्यांची भेट घेतली होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठीही ठोस धोरण सरकारने हाती घेणं आवश्यक आहे. अवकाळी पाऊस असो किंवा दुष्काळ पडलेला असो सरकार मदत देते हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. पण शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

राज्यातील शेतकरी अवकाळीमुळे संकटात सापडला आहे. त्याला मदत करायला हवी. शेतकरी जगला तरच राज्य तरेल. भविष्यात दुष्काळही पडू शकतो अशीही चर्चा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी  एक दीर्घकालीन योजना आखली पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले.