मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Bus Fire : नाशिकच्या राहुड घाटात अग्नितांडव; भीषण आगीत महामंडळाची बस जळून खाक

Nashik Bus Fire : नाशिकच्या राहुड घाटात अग्नितांडव; भीषण आगीत महामंडळाची बस जळून खाक

Jan 18, 2023, 04:07 PM IST

    • Nashik Bus Fire : नाशिकच्या राहुड घाटात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
Bus Fire In Rahud Ghat Nashik (HT)

Nashik Bus Fire : नाशिकच्या राहुड घाटात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

    • Nashik Bus Fire : नाशिकच्या राहुड घाटात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

Bus Fire In Rahud Ghat Nashik : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सातत्यानं बसला आग लागल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरालगत एका बसला भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता राहुड घाटात आणखी एका एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र बस संपूर्णतः जळून खाक झाली आहे. त्यानंतर आता स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. याशिवाय बसला आग लागल्यामुळं नाशिक-मालेगाव या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-मालेगाव महामार्गावर राहुड घाटात एका एसटी बसला भीषण आग लागली. त्यावेळी चालक आणि वाहकासह सर्व प्रवाशांनी सुरक्षितरित्या बसच्या बाहेर पडले. त्यानंतर पोलीस, प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु तोपर्यंत बसला संपूर्णपणे जळून खाक झाली होती. त्यामुळं आता गेल्या महिन्याभराच्या काळात नाशिकमध्ये तिसऱ्यांदा बसला आग लागल्याची घटना समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चांदवड जवळील राहुड घाटात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळं तिथं अनेकदा अपघाताच्या घटना समोर आलेल्या आहेत.

दरम्यान यापूर्वी पुण्यात दोनदा एसटी बसला आग लागल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर नाशिकमधील मिर्ची हॉटेल चौफुली, नाशिक-पुणे महामार्ग आणि सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता नाशिक-मालेगाव महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात झाल्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा