मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : आयकर विभागातील मॅटर मिटविण्यासाठी डॉक्टरांना मागीतले दहा लाख

Pune Crime : आयकर विभागातील मॅटर मिटविण्यासाठी डॉक्टरांना मागीतले दहा लाख

Jun 27, 2022, 05:57 PM IST

    • डॉक्टरांना दोन अनोळखी व्यक्तींनी रुग्णालयात जाऊन भेट घेत, मुंबईतील आयकर विभागात मॅटर मिटविण्यासाठी १० लाख रुपये रोख मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
Pune crime (HT_PRINT)

डॉक्टरांना दोन अनोळखी व्यक्तींनी रुग्णालयात जाऊन भेट घेत, मुंबईतील आयकर विभागात मॅटर मिटविण्यासाठी १० लाख रुपये रोख मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

    • डॉक्टरांना दोन अनोळखी व्यक्तींनी रुग्णालयात जाऊन भेट घेत, मुंबईतील आयकर विभागात मॅटर मिटविण्यासाठी १० लाख रुपये रोख मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील एका नामंकित रुग्णालयात काम करत असलेल्या डॉक्टरांना दोन अनोळखी व्यक्तींनी रुग्णालयात जाऊन भेट घेत, मुंबईतील आयकर विभागात मॅटर मिटविण्यासाठी १० लाख रुपये रोख मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

श्रीकांत पांढरे (वय ४५), किशोर जाधव व आणखी एक अशा तिघांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंर्दभात दिलीप नागेश माने (वय ६२,रा.मगरपट्टा सिटी,पुणे) यांनी पोलीसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जून रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता डॉ. दिलीप माने हे मगरपट्टा सिटीतील त्यांच्या नोबेल हॉस्पिटल याठिकाणी काम करत होते. त्यावेळी त्यांच्या कार्यालयात श्रीकांत पांढरे व आणखी दोघे आले. आरोपींनी संगनमत करुन तक्रारदार यांच्या विरोधात आयकर विभागातून तक्रार आली असून हे मॅटर मिटवायचे असल्यास १० लाख रुपयांची मागणी केली.

पैसे दिले नाही तर तुमच्यावर आयकर विभाग कारवाई करणार आहे अशी धमकी देऊन त्यांची धमकी देवून फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.शिंदे पुढील तपास करत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा