मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : सेलिब्रेशनचा केक कुणाचा ? पुण्यात हॉटेलमधील वादात दोघांना चोपले; गुन्हा दाखल

Pune Crime : सेलिब्रेशनचा केक कुणाचा ? पुण्यात हॉटेलमधील वादात दोघांना चोपले; गुन्हा दाखल

Jun 20, 2022, 05:55 PM IST

    • पुण्यात एका हॉटेलाच एक विचित्र प्रसंग समोर आला. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेला एका केकवर तरुणीने आपला हक्क सांगितल्याने हॉटेल मालक आणि बाऊंन्सरने दोघा तरुणांना केलेल्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime (HT_PRINT)

पुण्यात एका हॉटेलाच एक विचित्र प्रसंग समोर आला. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेला एका केकवर तरुणीने आपला हक्क सांगितल्याने हॉटेल मालक आणि बाऊंन्सरने दोघा तरुणांना केलेल्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • पुण्यात एका हॉटेलाच एक विचित्र प्रसंग समोर आला. बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलेला एका केकवर तरुणीने आपला हक्क सांगितल्याने हॉटेल मालक आणि बाऊंन्सरने दोघा तरुणांना केलेल्या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime :  पुण्यात एका हॉटेलमध्ये सेलीब्रेशनचा केक कुणाचा यावरून दोघा तरुणांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हॉटेल मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

Mumbai : पाऊस पडला, पण पाणी गेलं! मुंबईत पवई येथील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, १४ जणांचा मृत्यू

Monsoon update : बळीराजासाठी खूशखबर! मान्सूनबाबत हवामान खात्याची मोठी अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला येणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आर. सिद्धार्थ आणि त्याचा मित्र दिपक कुलकर्णी यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्याचे मित्र कुलकर्णी, त्याची बहिण तसेच काही मिंत्रासह बाणेर येथील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी केकची आॅर्डर दिली होती. त्यांनी दिलेल्या आॅर्डर नुसार त्यांचा केक त्यांच्या टेबलवर आला. मात्र, त्यांच्या शेजारी बसलेल्या एका जोडप्यातील मुलीने थेट फिर्यादीजवळ येत हा केक आमचा आहे. मी तो माझ्या बॉयफ्रेन्डसाठी मागवला असल्याचे सांगत ती तरुणी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांशी हुज्जत घालायला लागली.

 

यावेळी हॉटेलचालक आणि त्याचा बाउंन्सर त्या ठिकाणी आले. यावेळी हा वाद सोडवण्या ऐवजी त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात फिर्यादी सिद्धार्थ आणि त्याचा मित्र कुलकर्णी हे जखमी झाले. तसेच सर्वांना हॉटेल मालकाने बाहेर काढले. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी आणि त्याच्या मित्रांनी उपचार घेत थेट चतुश्रृंगी पोलिस ठाणे गाठले. यानंतर या प्रकरणी हॉटेल मालक आणि बाऊंन्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या