मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आठ मुलींची सुटका

Pune Crime : पुण्यात उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; आठ मुलींची सुटका

Jun 20, 2022, 03:31 PM IST

    • पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणा-या कोरेगाव पार्कातील एका मोठ्या सोसायटीत असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले असून पोसिलांनी ८ मुलींची सुटका केली आहे.
Pune Crime

पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणा-या कोरेगाव पार्कातील एका मोठ्या सोसायटीत असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले असून पोसिलांनी ८ मुलींची सुटका केली आहे.

    • पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणा-या कोरेगाव पार्कातील एका मोठ्या सोसायटीत असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले असून पोसिलांनी ८ मुलींची सुटका केली आहे.

Pune sex racket : पुण्यात उच्चभ्रू समजल्या जाणा-या कोरेगाव परिसरात एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. येथील ली ब्युटी स्पा या मसाज पार्लवर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकत ९ मुलींची यातून सुटका केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत २ महिलांसह ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभरात वादळी वारे अन् अवकाळीचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

किरण चंद्रकांत कोळी (वय २९, रा.पिंपरी,पुणे), महंमद इंजामुल हुसेन (वय १९, रा.कोरेगाव पार्क,पुणे), मुकुल घुले, अनुज कुमार राकेश पांडे, अब्दुल बतेने, सोना निगडे (सर्व रा.पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.

याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सत्यवान शंकर गौड यांनी आरोपीं विरोधात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क परिसरात नॉर्थ लिबर्टी मेन रस्त्यावर लिबर्टी सोसायटी असून त्याठिकाणी दुसऱ्या मजल्यावर ली ब्युटी स्पा आहे. या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने स्पा सेंटरवर छापा टाक ण्यात आला. यावेळी आठ तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळले. पोलिसांनी या आठ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. संबंधित महिलांना वेश्याव्यवसायाकरिता प्राप्त करुन घेऊन त्यांना पैशाचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून आरोपींद्वारे वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वत:ची उपजीविका भागवित असताना त्यांना ८८ हजार रुपयांच्या मुद्देमालासहित कारवाई करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या