मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना १६ लाख रुपयांनी गंडवले

Pune Crime : पुण्यात महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना १६ लाख रुपयांनी गंडवले

Jun 20, 2022, 04:16 PM IST

    • पुण्यात तरुणाला  महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १६ लाख रुपयांनी गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.
Pune Crime (HT_PRINT)

पुण्यात तरुणाला महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १६ लाख रुपयांनी गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

    • पुण्यात तरुणाला  महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १६ लाख रुपयांनी गंडवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Pune Crime : पुण्यात एका तरुणाला महापालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिशाने तब्बल १६ लाख १० हजार रुपयांनी लुबाडल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

Mumbai : पाऊस पडला, पण पाणी गेलं! मुंबईत पवई येथील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

आशिष उबाळे, संदीप उदमुले, यशोब देवकुळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी ओम विनायक मेमाणे (वय २४, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) याने या संदर्भात कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी आरोप उबाळे, उदमुले, देवकुळे यांच्याशी मेमाणे यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. यावेळी आमे मेमाणेला महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. त्यानंतर मेमाणे, त्याचे मित्र शरद शिंदे, मयूर पवार आरोपींना भेटले. त्यांच्याकडे नोकरीबाबत विचारणा केली.

आरोपींनी त्यांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तिघांकडून आरोपींनी १६ लाख १० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी नोकरीबाबत आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी तिघांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील उपायुक्तांच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र दिले. नियुक्त पत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या