मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : क्रिप्टो करन्सीचा लोभ पडला महागात; तरुणाला साडेनऊ लाखांचा चुना

Pune Crime : क्रिप्टो करन्सीचा लोभ पडला महागात; तरुणाला साडेनऊ लाखांचा चुना

Jun 20, 2022, 03:16 PM IST

    • पुण्यात एका तरुणाला क्रिप्टो करन्सीचा लोभ चांगलाच महागात पडला आहे. आभासी चलन देतो सांगून त्याची साडेनऊ लाखांची फसवणू करण्यात आली आहे.
Pune Crime (REUTERS)

पुण्यात एका तरुणाला क्रिप्टो करन्सीचा लोभ चांगलाच महागात पडला आहे. आभासी चलन देतो सांगून त्याची साडेनऊ लाखांची फसवणू करण्यात आली आहे.

    • पुण्यात एका तरुणाला क्रिप्टो करन्सीचा लोभ चांगलाच महागात पडला आहे. आभासी चलन देतो सांगून त्याची साडेनऊ लाखांची फसवणू करण्यात आली आहे.

Pune crime पुण्यात आॅनलाईन फ्रॉडच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. थोड्या लोभापाई अनेक जण मोठी रक्कम गमावून बसत आहे. अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली असून क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल साडेनऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक! हरयाणातून घेतले ताब्यात

विक्रांत इश्वर गर्ग, नैना देवेंद्र जॉन असे फसवणूक केलेल्या बंटी बबलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अब्दूल वारी नझीर (वय ३२) या तरुणाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेची हकीगत अशी की नैना देवेंद्र जॉन हिचा सलमान हा मित्र आहे. आरोपी नैना आणि विक्रांतने सलमानच्या औळखीचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्याला दोघांनी मिळून बाजारभावापेक्षा स्वस्त दरात क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) देतो असे सांगितले. या साठी दोघांनी सलमानकडून वेळोवेळी तब्बल ९ लाख ३९ हजार ९३८ रुपये बँकखात्यातून ट्रान्सफर करून घेतले.

काही दिवसानंतर सलमानने दोघांना क्रिप्टोकरन्सीची मागणी केली. मात्र, दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. सलमान सातत्याने त्यांना फोन करू लागला. मात्र, त्यांनी त्यांच्या कुठल्यास फोनला उत्तर दिले नाही. यानंतर सलमानला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने ताबडतोब लष्कर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. दरम्यान, आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पवार हे पुढील तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या