मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे ज्यांनी बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे"

Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे ज्यांनी बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे"

Sep 02, 2022, 10:30 PM IST

    • ज्यांनी उद्धव  ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे, ते बाळासाहेबाचे सच्चे बंदे" असं म्हणत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केलं आहे.
रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ज्यांनी उद्धव ठाकरेंच्यासत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नावएकनाथ शिंदे, ते बाळासाहेबाचे सच्चे बंदे" असं म्हणत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेकौतुक केलं आहे.

    • ज्यांनी उद्धव  ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे, ते बाळासाहेबाचे सच्चे बंदे" असं म्हणत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केलं आहे.

केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या चुटकुले व कवितांसाठी ओळखले जातात. आता त्यांना कवितेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे. "ज्यांनी उद्धव  ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे, ते बाळासाहेबाचे सच्चे बंदे" असं म्हणत शिंदेंचे कौतुक केलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले य

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

आता एकनाथ शिंदे राहिलेले नाहीत अंधे, ते आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे बंदे. बाळासाहेब ठाकरेंना मानणारे एकनाथ शिंदे. त्यामुळेच शिंदेना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. खरी शिवसेना ही आता एकनाथ शिंदेंच्या बाजुने आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून धनुष्य़बाण ही निशाणी शिंदेंना मिळेल, असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचा एक मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे शिवसेनेला एक जबरदस्त असा धक्का बसला आहे. महाआघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात सरकार आले असून पुढील अडीच वर्षे व त्यानंतरही हेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

राज्य मंत्रिमंडळात चांगलं खातं मिळावं - आठवले

 आठवले म्हणाले की, आरपीआय गेल्या जवळपास १० वर्षापासून भाजपसोबत काम करत आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला एक पद मिळावे. तसेच खाते कोणते द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील .चांगलं खातं मिळावं ही अपेक्षा आहे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे. 

आठवले म्हणाले की, भाजपने मनसेला सोबत घेतल्यास देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारे नाही.