मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur Accident : चंद्रपूर येथे भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्याने बस उलटली; २ ठार, १७ जखमी

Chandrapur Accident : चंद्रपूर येथे भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्याने बस उलटली; २ ठार, १७ जखमी

Jan 28, 2023, 10:40 AM IST

  • Chandrapur Bus Accident Today : चंद्रपूर येथे विरूर-धानोरा मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक खासगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यात २ प्रवासी जागीच ठार झाले तर तब्बल १७ जण जखमी झाले आहेत.

Chandrapur Accident (HT)

Chandrapur Bus Accident Today : चंद्रपूर येथे विरूर-धानोरा मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक खासगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यात २ प्रवासी जागीच ठार झाले तर तब्बल १७ जण जखमी झाले आहेत.

  • Chandrapur Bus Accident Today : चंद्रपूर येथे विरूर-धानोरा मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक खासगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यात २ प्रवासी जागीच ठार झाले तर तब्बल १७ जण जखमी झाले आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूर येथे एका बस चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन हैदराबादला जाणारी एक खासगी बस ही शुक्रवारी मध्यरात्री विरुर- धानोरा मार्गावर पलटली. या अपघातात २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १७ जण गंभीर जखमी झाले. यातील काही प्रवाशी हे गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार हा अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या विरूर- धानोरा मार्गावर घडला. एक खासगी बस प्रवाशांना घेऊन हैद्राबाद येथे जात होती. गाडीत तब्बल ३० ते ३५ च्या वर प्रवासी होते. मध्यरात्रीच्या सुमारास ही बस जात असतांना अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्यावर पलटी झाली. या घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर १७ ते १८ प्रवासी जखमी झाले. यातिल काही प्रवासी हे गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहचले. त्यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढत त्यांना रुग्णालयात दाखल केले. काही जखमींना राजुरा तर काहींना चंद्रपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा