मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. शास्त्रज्ञ कुरुलकरने अनेक फाइल्स, व्हिडिओ व फोटो ISI ला शेअर केले; अनेक महिलांच्या भेटीगाठी!

धक्कादायक.. शास्त्रज्ञ कुरुलकरने अनेक फाइल्स, व्हिडिओ व फोटो ISI ला शेअर केले; अनेक महिलांच्या भेटीगाठी!

May 09, 2023, 08:59 PM IST

  • Pradeep kurulkar : प्रदीप कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

Pradeep kurulkar

Pradeep kurulkar : प्रदीप कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचंएटीएसच्या तपासात समोर आले आहे.

  • Pradeep kurulkar : प्रदीप कुरुलकर ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याला पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआयला देशातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (मंगळवार) संपत असल्याने कुरुलकर याला आज न्यायालयात हजर करणार आले होते. प्रदीप कुरुलकर हे ई मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच ते अनेक महिलांना भेटत असल्याचं एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

कुरुलकर यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्याजवळची संवेदनशील सरकारी माहिती पाकिस्तानला पुरवत होते. त्याचबरोबर प्राथमिक अंदाजानुसार ते हनी ट्रॅपमध्ये सापडल्याने पाकिस्तानला हवी तीमाहिती देत असल्याचा एटीएसला संशय आहे.

प्रदीप कुरुलकर यांना अटक केल्यानंतर एटीएसने त्यांच्या सर्व वस्तू जप्त करून त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातुन ही धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रदीप कुरुलकर डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे अनेक महिलांना भेटत होते. त्याचाही तपास करण्याची गरज असल्याचं एटीएसने न्यायालयात सांगितलं. प्रदीप कुरुलकर यांच्या बॅक अकाउंटमधे बाहेरच्या देशातून पैसे आल्याचा संशय असून याचाही तपास केला जाणार आहे. कुरुलकर यांनी सरकारी पासपोर्टचा उपयोग करुन पाच ते सहा देशांना भेटी दिल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालं आहे.

 

प्रदीप कुरुलकर यांनी त्यांच्या मोबाईल, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील काही डेटा डिलीट केल्याचे समोर आले होते. ती माहिती नक्की काय होती तसेच तो डेटा त्यांनी पाकिस्तानला पुरवला आहे का, याचा तपास केला जाणार आहे. न्यायालयाने त्याची एटीएस कोठडी १५ मे पर्यंत वाढवली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा