मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंतप्रधान मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

Pankaja Munde : पंतप्रधान मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

Sep 27, 2022, 09:12 PM IST

    • पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. इतकं बोलून पंकजा काही वेळ थांबल्या व म्हणाल्या की, मात्र मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही.
पंकजा मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे.इतकं बोलून पंकजा काही वेळ थांबल्या व म्हणाल्या की, मात्र मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे,पण मला कोणी संपवू शकणार नाही.

    • पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. इतकं बोलून पंकजा काही वेळ थांबल्या व म्हणाल्या की, मात्र मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही.

बीड- मी वंशवादाचं प्रतिक आहे मात्र जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान मोदीही (Pm Narendra Modi) संपवू शकत नाहीत,असं खळबळजनक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना व्यासपीठावरुन त्यांनी हे विधान केले आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. इतकं बोलून पंकजा काही वेळ थांबल्या व म्हणाल्या की, मात्र मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही. स्वत: मोदी सुद्धा मला संपवू शकणार नाहीत, पण, जर तुमच्या मनात मी राज्य केलं असेल तर. तुमच्यामुळं जर मी काही चांगलं करु शकले तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय घ्यायचे असतात. परंतु, अलिकडेचे राजकारण केवळ मनोरंजनाचे साधन होत आहे. हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नाही, असेही पंकजा म्हणाल्या.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा