मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट; मुंबईत तरुणाला अटक!

BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट; मुंबईत तरुणाला अटक!

Aug 09, 2022, 09:09 AM IST

    • Governor BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
Maharashtra governor Bhagat Singh Koshyari (HT_PRINT)

Governor BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

    • Governor BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

Governor BS Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात सायबर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा मुंबईतील मालाडमध्ये राहणारा असून प्रदीप भालेकर असं आरोपीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आरोपी भालेकर यानं ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी भालेकरविरुद्ध पश्चिम क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा युनिट आणि मुंबई गुन्हे शाखेच्या मदतीनं आरोपी भालेकरला अटक केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी 'राजस्थानी आणि गुजराती लोकांनी मुंबई सोडली तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचं' वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संतापलेल्या आरोपीनं राज्यपालांविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट केली होती. याशिवाय आरोपी भालेकरनं केवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधातच नाही तर भाजप आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातही अनेक पोस्ट लिहिलेल्या आहेत. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला कलम १५३(ए), ५००, कलम ६७ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा