मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर

Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर

Mar 29, 2023, 03:16 PM IST

  • Ankush Kakade on Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाचा धक्का बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या अश्रूचा बांध आज फुटला. 

Ankush Kakade - Girish Bapat

Ankush Kakade on Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाचा धक्का बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या अश्रूचा बांध आज फुटला.

  • Ankush Kakade on Girish Bapat : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाचा धक्का बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांच्या अश्रूचा बांध आज फुटला. 

Ankush Kakade on Girish Bapat : पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल पुण्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. एक सुसंस्कृत, समंजस आणि समन्वयी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पुण्यात भाजपची कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बापट यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना अश्रू अनावर झाल्याचं आज पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

अंकुश काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. गिरीश बापट हे त्यांचे जीवलग मित्र होते. त्यांच्या मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच असायची. गिरीश बापट हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असताना अंकुश काकडे हे आवर्जून त्यांना भेटायला जात व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत. बापट यांच्या निधनाचं दु:ख काकडे यांना सहन झालं नाही. वृत्तवाहिन्याकडं बापट यांच्या विषयी बोलताना काकडे यांच्या अश्रूचा बांध फुटला.

‘गिरीश आज आपल्यात नाही हे दु:ख सहन होत नाही. राजकारणाच्या पलीकडं जाऊन मैत्री करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात होतो, पण आमच्या मैत्रीत कधीच अंतर पडलं नाही,’ असं काकडे म्हणाले.

‘आठवड्यातून दोन दिवस मी त्यांना भेटायला जायचो. मी सोमवारीच त्यांना भेटलो होतो. ते आयसीयूमध्ये होते. डायलिसीस करून आल्यामुळं थोडे थकल्यासारखे वाटत होते. माझं बोलणं झालं. रात्री साडेनऊपर्यंत आम्ही एकत्र होतो. राज ठाकरे यांची सभा आम्ही पाहिली. त्यावर त्यांनी काही कमेंटही केल्या. अंकुश, मला आता नकोसं वाटतंय, केव्हा सुटतोय असं झालंय, असं त्यावेळी ते म्हणत होते. पण इतक्या लवकर तो सोडून जाईल असं वाटलं नव्हतं,' असं काकडे म्हणाले.

आमच्या मैत्रीचे खूप प्रसंग आहेत. सख्ख्या भावापेक्षा जास्त गिरीशनं माझ्यावर प्रेम केलं. पुणे महापालिकेत आम्हाला GAS (गिरीश, अंकुश, शांतिलाल) नावानं ओळखायचे. आम्ही वेगळ्या पक्षात असूनही कधी पक्षाशी गद्दारी केली नाही. मित्र असला तरी राजकीय पक्ष वेगळे असल्यानं मी त्यांना मत देऊ शकलो नव्हतो, असंही काकडे यांनी सांगितलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा