मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar On Gautami Patil : पाटीलबाईला बोलवायचं का? अजित पवारांच्या प्रश्नाने एकच कल्ला, पाहा VIDEO

Ajit Pawar On Gautami Patil : पाटीलबाईला बोलवायचं का? अजित पवारांच्या प्रश्नाने एकच कल्ला, पाहा VIDEO

Apr 25, 2023, 08:02 PM IST

  • Ajit Pawar On Gautami Patil : अजित पवार आज  बारामतीमध्ये होते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पाटीलबाईला बोलावयचं का? असा सवाल केला आणि उपस्थितांमध्ये एकच हश्शा पिकला.

Ajit Pawar On Gautami Patil

Ajit Pawar On Gautami Patil : अजित पवार आज बारामतीमध्ये होते.यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पाटीलबाईला बोलावयचं का?असा सवाल केला आणिउपस्थितांमध्येएकच हश्शा पिकला.

  • Ajit Pawar On Gautami Patil : अजित पवार आज  बारामतीमध्ये होते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पाटीलबाईला बोलावयचं का? असा सवाल केला आणि उपस्थितांमध्ये एकच हश्शा पिकला.

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रचारात अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली. अजित पवार आज बारामतीमध्ये होते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना पाटीलबाईला बोलवायचं का? असा सवालच केला आणि उपस्थितांमध्ये एकच हश्शा पिकला.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत टोलेबाजी करत कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यक्रमात अजित पवारांनी लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच कल्ला झाला.

अजित पवार म्हणाले की, दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या पाटील बाईला बोलवा, काय त्यांचे नाव गौतमी, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार यांनी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले.

यापूर्वी काय म्हणाले होते अजित पवार -

राज्यात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जातात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. यामध्ये लावणीच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा