मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “तुमचा फौजदाराचा हवालदार केला, आमची मापं कशाला काढता?”, जयंत पाटलांचा फडणवीसांवर जहरी पलटवार

“तुमचा फौजदाराचा हवालदार केला, आमची मापं कशाला काढता?”, जयंत पाटलांचा फडणवीसांवर जहरी पलटवार

May 08, 2023, 07:10 PM IST

  • Jayant patil on Devendra fadnavis : भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापं कशाला काढता? असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. 

Jayant patil on Devendra fadnavis

Jayant patil on Devendra fadnavis : भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापंकशाला काढता? असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.

  • Jayant patil on Devendra fadnavis : भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापं कशाला काढता? असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. 

Karnataka election campaign: कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार असून आज निवडणूक प्रचाराची सांगता झाली. राष्ट्रवादीने निपाणीत जाहीर सभा घेत देवेंद्र फडणवीसांवर जहरी पलटवार केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पार्सल महाराष्ट्रात पाठवा त्याचे काय करायचे ते पाहतो, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निपाणीमध्ये जाहीर सभेमध्ये केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणीमध्येच जाहीर सभा घेत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापं कशाला काढता? शरद पवार यांच्या झंझावातात २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले.

रविवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष असणारा राष्ट्रवादी कर्नाटकात काय डोंबलं करणार? यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल करताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.जयंत पाटील म्हणाले की, देशात हुकूमशाही वाढत असून विरोधात बोलणाऱ्यांना गप्प बसवले जात आहे. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार यावं अशीच आमची इच्छ आहे.राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार निवडून येतील असा दावा पाटील यांनी केला.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सोलापुरात उत्तर दिले. आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे, आणि कोण किती वस्ताद आहे, या सगळ्या खोलात तिथे बोलायचे, येथे नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना निपाणीत जाऊनच उत्तर देऊ, असे म्हटले होते.