मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नांदेड हादरलं.. वरातीत नाचण्यावरून दोन गटात राडा; तरुणाची हत्या, ९ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

नांदेड हादरलं.. वरातीत नाचण्यावरून दोन गटात राडा; तरुणाची हत्या, ९ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Jun 02, 2023, 10:47 PM IST

  • Nanded crime news  : वरातील नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

नांदेडमध्ये तरुणाचा खून

Nandedcrimenews : वरातील नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकूनखून करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

  • Nanded crime news  : वरातील नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

नांदेड– नांदेडमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. वरातील नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. नांदेड शहराजवळ असलेल्या बोंढार हवेली या गावात गुरुवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात९ जणांविरोधात खूनाचा तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Pune Lohegaon News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोंढार हवेली गावात गुरुवारी विवाह सोहळा होता. यानिमित्त गावातून लग्नाची वरात काढण्यात आली होती. वरातीत काही तरुण डीजे लावून नाचत होते. त्यावेळी गावातील अक्षय भालेराव हा युवक तिथे आला. यावेळी वरातील नाचण्यावरुन अक्षय भालेराव आणि वरातीत नाचणाऱ्या युवकांचा काही कारणावरून वाद होता.

या वादानंतर वरातीतील युवकांनी अचानक अक्षयवर हल्ला चढवला. चाकूने अक्षयच्या पोटात सपासप वार करण्यात आले. यावेळी दोन गटात दगडफेक देखील झाली. काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर अक्षयला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.



या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी ९ आरोपींविरुद्ध हत्या आणि ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा