मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बोलावून नाशिकमध्ये फर्निचर व्यावसायिकाची हत्या

Nashik Crime ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बोलावून नाशिकमध्ये फर्निचर व्यावसायिकाची हत्या

Sep 12, 2022, 10:29 AM IST

    • Nashik Murder : नाशिक रोड येथे एका फर्निचर व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
Crime News (HT)

Nashik Murder : नाशिक रोड येथे एका फर्निचर व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

    • Nashik Murder : नाशिक रोड येथे एका फर्निचर व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक : नाशिक रोड येथे एका फर्निचर व्यावसायिकाला फर्निचर बनवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत त्यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघसकीस आली आहे. एकलहरा रोडवरील लाकडी फर्निचर बनविणाऱ्या स्वस्तिक कारखान्याचे संचालक व्यावसायिक शिरीष गुलाबराव सोनवणे (वय ५६) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. आरोपींनी त्यांचा खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट! घराबाहेर पडतांना काळजी घ्या

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

शिरीष सोनवणे हे फर्निचर व्यावसायिक आहे. त्यांचा स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. ते शालेय लाकडी बाक तयार करतात. शुक्रवारी सोनवणे हे दुपार नंतर त्यांच्या कारखान्यात गेले होते. त्यांच्या कारखान्यात काही व्यक्ति या कारमधून आल्या. त्यांनी कारखान्यातील एका कर्मचाऱ्याला बोलावून घेत ऑर्डर द्यायची आहे असे सांगितले. सोनवणे यांना बोलवण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने त्यांना आज येण्यास सांगितले. मात्र, अपंग असल्याचे कारण देत सोनवणे यांना कार जवळ येण्यास सांगितले. यानंतर सोनवणे हे बाहेर आले आणि ते गाडी जवळ गेले. त्यांतर ते त्यांच्या गाडीत बसले. आरोपींनी सोनवणे यांना घेऊन अज्ञात ठिकाणी नेले. आणि त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह कलव्यात फेकून दिला. सोनवणे हे घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी यांनी पोलिसांत ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

शनिवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव पोलिसांना सापडला. मृतदेहावर विविध जखमाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वस्तिक कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे अगोदरपासूनच बंद असून कामगारांची देखील चौकशी केली जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा