मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News : धक्कादायक ! वाकोल्यात उघड्या वीजवाहक तारेचा शॉक लागून चिमुकली ठार; चिमुकला जखमी

Mumbai News : धक्कादायक ! वाकोल्यात उघड्या वीजवाहक तारेचा शॉक लागून चिमुकली ठार; चिमुकला जखमी

Jun 03, 2023, 11:40 AM IST

    • Mumbai News : मुंबईतील वाकोल्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने एका सात वर्षीय चिमुकली ठार झाली तर एक छोटा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे.
Death (Representative Image)

Mumbai News : मुंबईतील वाकोल्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने एका सात वर्षीय चिमुकली ठार झाली तर एक छोटा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे.

    • Mumbai News : मुंबईतील वाकोल्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने एका सात वर्षीय चिमुकली ठार झाली तर एक छोटा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई : मुंबईच्या वाकोला येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पदपथाच्या दिव्याच्या खांबाच्या उघड्या वीजवाहक तारेचा शॉक लागल्याने एका ६ वर्षांच्या वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. तर ५ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर व्हीएन देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना वाकोल्यातील चैतन्यनगर इथे शुक्रवारी रात्री घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, रायगडसह 'या' जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट! घराबाहेर पडतांना काळजी घ्या

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

Mumbai Megablock : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा; पश्चिम रेल्वेवर उद्या १४ तासांचा मेगाब्लॉक

तेहरीन इफ्तिकार (वय ६) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर तनिष शिंदे (वय ५) हा मुलगा मुलगा जखमी झाला. या घटनेचे वृत्त असे की, हे दोघेही शुक्रवारी रात्री १० च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला खेळत होते. दरम्यान, या ठिकाणी असेलेल्या एका पथदिव्याच्या खांबाकडे एक पथदिवा आहे. या ठिकाणी वीज वाहिनीची एक तर मोकळी होती. यावेळी खेळतांना या दोघांचा या उघडल्या वीज वाहिनीला हात लागला. यात विजेच्या तीव्र झटका लागल्याने तेहरिंनचा जागेवरच मृत्यू झाला तर तनिष हा जखमी झाला. त्या मुलांना स्थानिकांनी व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेहरीन इफ्तिकारचा मृत्यू झाला होता.

 

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची पूर्ण जबाबदारी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांची आणि बाजूला काम सुरु असलेल्या विकासकांची असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा