मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro: कांजूर मार्ग कारशेडबाबत सोमय्यांच्या पत्राला MMRDA चे उत्तर

Mumbai Metro: कांजूर मार्ग कारशेडबाबत सोमय्यांच्या पत्राला MMRDA चे उत्तर

Jul 12, 2022, 09:27 AM IST

    • किरीट सोमय्या यांनी तीन पानी पत्र लिहून आरे ते कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड हलवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.
किरीट सोमय्या (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

किरीट सोमय्या यांनी तीन पानी पत्र लिहून आरे ते कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड हलवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.

    • किरीट सोमय्या यांनी तीन पानी पत्र लिहून आरे ते कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड हलवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कांजूरमार्ग कारशेड (Kanjur Car Shed) संदर्भात एमएमआरडीएला (MMRDA) पत्र लिहिलं होतं. आरेऐवजी कांजूर मार्ग इथं कारशेड व्हावं अशी आधीच्या सरकारने भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून मेट्रोबाबत माहिती मागवली होती. कांजूरमार्ग इथं मेट्रो कारशेड प्रस्तावित आहे. महाविकास आघाडीने आरे कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपकडून विरोध करण्याता आला. आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा हा निर्णय बदलला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी तीन पानी पत्र लिहून आरे ते कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड हलवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. यावर एमएमआरडीएकडून उत्तर देण्यात आलं असून त्यात म्हटलं आहे की, कांजूर कार शेड हे एका पेक्षा जास्त मेट्रो लाइनचा वापर करणे हे व्यवहार्य नाही. आरे कार शेड इतरत्र हलवण्याचा निर्णय हा आपत्तीजनक असल्याचं एमएमआरडीएच्या सल्लागारांच्या बैठकीच्या अहवालात म्हटलं होतं.

कांजूर कारशेड एकापेक्षा जास्त मार्गासाठी वापरणं व्यवहार्य नाही. कांजूर शेड एकाचा मार्गासाठी वापरावं असं अहवालात म्हटलं होतं. किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, कांजूर कारशेड बाबत ठाकरे सरकारने गंडवलं. महाआघाडी सरकारने कारशेड कांजूरला नेण्यासाठी जिद्द केली होती. तीन वेगवेगळ्या मेट्रो लाइनचं कारशेड होईल असं म्हटलं होतं. तेव्हा तत्कालीन सरकारने दिशाभूल केली होती असा आरोपही सोमय्या यांनी केला.

राज्यात सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने मेट्रो कारशेडबाबत घेतलेला निर्णय़ बदलला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, "मेट्रो ३ कारशेड आरेमध्येच होईल. आरेमध्ये ज्या जागी मेट्रो कारशेडचं २५ टक्के काम झालं आहे तिथेच १०० टक्के काम होईल. हेच मुंबईचं हित आहे कारण यामुळे मेट्रो लवकर सुरू होईल."