मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या पुढील तीन दिवस रद्द

Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या पुढील तीन दिवस रद्द

Apr 12, 2023, 06:31 AM IST

    • Mumbai Local Train News : कर्जतच्या यार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कामं आटोपण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटदरम्यान पुढील तीन दिवस ब्लॉक घोषित केला आहे.
Local Train

Mumbai Local Train News : कर्जतच्या यार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कामं आटोपण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटदरम्यान पुढील तीन दिवस ब्लॉक घोषित केला आहे.

    • Mumbai Local Train News : कर्जतच्या यार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कामं आटोपण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटदरम्यान पुढील तीन दिवस ब्लॉक घोषित केला आहे.

मुंबई : मुंबईकरांनो आज जर घरच्या बाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक बघून घराबाहेर पडा. कारण कर्जत ते खोपोलीदरम्यान पुढील तीन दिवस कर्जत यार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कामे हाती घेण्यात आली असून, या साठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटमार्गादरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉक कालावधीत दोन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर; लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक आलं समोर

Narendra Dabholkar Murder Case: आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

Narendra Dabholkar case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

ब्लॉक कालावधीत दुपारी १.१५ची कर्जत ते खोपोली आणि २.५५ची खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द राहणार असल्याने खोपोलीहून दुपारी १.४८ला सुटणारी सीएसएमटी लोकल कर्जत स्थानकातून चालवण्यात येईल.

मुंबईत लोकलसेवा ही जीवनवाहिनी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीच्या विविधी कामांमुळे ही लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे हाच पर्याय असल्याने ही सेवा जर विस्कळीत झाली तर त्यांच्या दैनंदिनिवर परिणाम होतो. यामुळे ही सेवा सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा