मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mega Block : मुंबईकरांना दिलासा.. येत्या रविवारी तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक नाही

Mega Block : मुंबईकरांना दिलासा.. येत्या रविवारी तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक नाही

Jan 27, 2023, 09:30 PM IST

  • Mumbai local mega block : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. मात्र मध्य मार्गावर खडावली ते आसनगाव दरम्यान रात्रीच्या वेळी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येईल.

Mega Block

Mumbai local mega block : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. मात्र मध्य मार्गावर खडावली ते आसनगाव दरम्यान रात्रीच्या वेळी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येईल.

  • Mumbai local mega block : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. मात्र मध्य मार्गावर खडावली ते आसनगाव दरम्यान रात्रीच्या वेळी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येईल.

Local Mega Block : रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबईत प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. यामुळे सुट्टीदिवशी दिवसभर मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी  मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोकल रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी (२९ जानेवारी २०२३) मेगाब्लॉक नाही. त्यामुळे फिरायला जाण्याचा बेत करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

 

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही मात्र मध्य रेल्वेच्या खडावली ते आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी व रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल रेल्वे सेवा आणि लांब पल्याचा मेल-एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे.  

मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी  मध्यरात्री ०२.०५ ते पहाटे ०४.०५ या वेळेत खडवली आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे या दरम्यान केली जातील. 

 पॉवर ब्लॉकमुळे लोकल सेवेवर होणार परिणाम -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री सव्वा बारा वाजता कसारासाठी सुटणारी  लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. 

कसारा येथून पहाटे सव्वा तीन वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल ठाणे येथून सोडण्यात येईल. 

खालील लांब पल्ल्याच्या गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे ३५ मिनिटे ते ९५ मिनिटांपर्यंत थांबल्या जातील व विलंबना गंतव्याकडे रवाना होतील. 

  • ट्रेन क्रमांक २०१०४ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस  सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक १८०३०  शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस  एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक १२८१० हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल नागपूर मार्गे
  • ट्रेन क्रमांक १२१५२  शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस.
  • ट्रेन क्रमांक ११४०२ आदिलाबाद - मुंबई एक्सप्रेस