मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. मुंबईत बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रिक्षावर पडला, मायलेकीचा मृत्यू

धक्कादायक.. मुंबईत बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रिक्षावर पडला, मायलेकीचा मृत्यू

Mar 11, 2023, 08:06 PM IST

  • rickshaw Accident : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून मुलगी जखमी झाली आहे.

अपघातग्रस्त रिक्षा

rickshaw Accident : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्याचौथ्या मजल्यावरून लोखंडीरॉड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून मुलगी जखमी झाली आहे.

  • rickshaw Accident : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून मुलगी जखमी झाली आहे.

Mumbai rickshaw Accident : मुंबईत इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून स्लॅबचा भाग अंगावर कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तशाच प्रकारचा अपघात जोगेश्वरी पूर्वमध्ये घडला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यामध्ये मायलेकीचा मृत्यू झाला आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.शमाबानो शेख (वय २७) व आयात शेख (वय ९) अशी मृतांची नावे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूस  असलेल्या सोनार चाळ परिसरात घडली. मलकानी डेव्हलपर्सकडून येथे बांधकाम सुरू आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एक महिला व तिची लहान मुलगी जोगेश्वरी स्टेशन रस्त्यावरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने जात होत्या. त्यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडला. हा रॉड मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर पडला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. या घटनेमध्ये सुदैवाने रिक्षा चालक सुखरूप वाचला आहे. 

अपघातनंतर महिलेला आणि तिच्या मुलीला जवळच्या ट्रामा केयर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेमुळे स्थानिक लोकांनी बांधकाम साईटवर होत असलेल्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा