मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dadar Fire Incident : दादरमधील रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Dadar Fire Incident : दादरमधील रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Jan 26, 2023, 11:07 PM IST

    • Dadar Fire Incident : दादरमधील एका रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Fire Incident In RA Residency Tower Dadar (HT)

Dadar Fire Incident : दादरमधील एका रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

    • Dadar Fire Incident : दादरमधील एका रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire Incident In RA Residency Tower Dadar : दादर पूर्व भागातील आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम जारी आहे. या भीषण आगीत कोणत्याही जीवीतहानीचं वृत्त समोर आलेलं नाही. परंतु आता इमारतीतील सर्वात वरच्या मजल्यावर आग लागल्याची घटना समोर आल्यामुळं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांना घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील आरए रेसिडेन्सी टॉवरच्या ४२ व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळं अपार्टमेंटला आग लागली असून त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीची घटना घडल्यामुळं अपार्टमेंट खाली करण्याचं काम सुरू आलं असून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येत असल्याची माहिती आहे. इमारतीत लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचं मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दादरमधील ज्या इमारतीत आग लागली आहे ती इमारत दादर रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मदत व बचावकार्य सुरू केलं असून इमारतीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा