मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Road Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, नाशिक येथील दुर्दैवी घटना

Nashik Road Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, नाशिक येथील दुर्दैवी घटना

Jan 11, 2023, 06:53 PM IST

  • Mumbai-Agra national highway Accident: ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती समोर येत आहे.

Nashik Road Accident (HT)

Mumbai-Agra national highway Accident: ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती समोर येत आहे.

  • Mumbai-Agra national highway Accident: ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती समोर येत आहे.

Three of family killed in road accident in Nashik: नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबियातील तिघांचा मृत्यू झालाय. तर, एक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली. या अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. या अपघातातील ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

सुधाकर अडोळे (वय, ५१) असं या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर अडोळे आणि त्यांचा पुतण्या रोहित भागीरथ अडोळे (वय, १८) घोडागाडीवरून आणि त्यांची दोन मुलं कुशल अडोले (वय, २०) आणि प्रभाकर अडोळे (वय, २२) मोटारसायकलवरून जात असताना हा अपघात झाला. कुटुंबातील चारही सदस्य घरी जात होते. त्यांनी सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला असता एका भरधाव ट्रकनं दुचाकी आणि घोडागाडीला धडक दिली. या अपघातात कुशल अडोळे, प्रभाकर अडोळे आणि भागीरथ अडोळे यांचा मृत्यू झाला. तर, सुधाकर अडोळे हे जखमी झाले.

ट्रक चालकाचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या सुधाकर अडोळे यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. या अपघातानंतर ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्यानं अडोळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

मुंबई- आग्रा महामार्गावर आणखी एक अपघात

मुंबई- आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलीसांच्या वाहनाला अपघात झाला. या घटनेत नाशिक शहर दलाचे 3 पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे (वय, 57), सचिन परमेश्वर सुक्ले (वय, 43), रविंद्र नारायन चौधरी (वय, 37) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. नाशिकहुन मुंबईच्या दिशेनं जातांना ही घटना घडलीय.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा