मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar Conflict : हिंसाचारामागचे मास्टरमाइंड फडणवीस, खैरेंचा आरोप… फडणवीसांनी दिलं उत्तर

Sambhaji Nagar Conflict : हिंसाचारामागचे मास्टरमाइंड फडणवीस, खैरेंचा आरोप… फडणवीसांनी दिलं उत्तर

Mar 30, 2023, 08:55 PM IST

  • Sambhaji Nagar Conflict : संभाजीनगर राड्यामागचे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप संभाजीनगरचे माजी खासदार, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

खैरेंच्या आरोपावर फडणवीसांचे उत्तर..

Sambhaji Nagar Conflict : संभाजीनगर राड्यामागचे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअसल्याचाखळबळजनक आरोप संभाजीनगरचे माजी खासदार, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीकेला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

  • Sambhaji Nagar Conflict : संभाजीनगर राड्यामागचे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप संभाजीनगरचे माजी खासदार, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

रामनवमीच्या मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांमध्ये झालेला राडा या भाजपचा पूर्वनियोजित कट होता. हे भागवत कराड व इम्तियाज जलील यांचे प्लानिंग होते तसेच या घटनेचे मास्टरमाईंड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

फडणवीस म्हणाले की, रामनवमीच्या रात्री संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुदैवी आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून राजकीय नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून परिस्थिती बिघडवू नये. पोलीस आपली कामगिरी चोख बजावत आहेत.

यापूर्वी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून भाजपने हा कट रचला आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड व खासदार इम्तियाज जलील यांनी हे घडवून आणले आहे. याचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असून एमआयएम भाजपची बी टीम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान खैरेंचे हे आरोप भागवत कराड यांनी फेटाळून लावले आहेत.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, हे शिंदे सरकारचे अपयश आहे. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असून केवळ आपली माणसे व खोके सांभाळण्यात ते व्यस्त आहेत. पोलिसांना जे काही आदेश आहेत, त्यानुसार ते काम करतात. मात्र मुख्य अपयश राज्य सरकारचे आहे. अशा दंगली घडवून राजकारणाची पोळी भाजण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोपही खैरे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे मध्यरात्री राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली. यामुळे येथील वतावरून तणावपूर्ण झाले आहे. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली. किराडपुरा भागात राम मंदिर आहे. आज या ठिकाणी विविध कार्यक्रम असल्याने गैर प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी दोन गट समोरासमोर आले.

 

दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दगडफेक झाली. या गोंधळात काही समाजकंटकांनी मंदिरासमोर उभे असलेली पोलिसांची व्हॅन पेटवून दिली. ही घटना स्थानिकांना समजताच परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.