मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Polls 2022: मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप का?

MLC Polls 2022: मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप का?

Jun 20, 2022, 05:33 PM IST

    • Laxman Jagtap and Mukta Tilak: भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांनी गुप्त मतदान पद्धतीच्या नियमांचा भंग केला आहे, असा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे.
Laxman Jagtap - Mukta Tilak

Laxman Jagtap and Mukta Tilak: भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांनी गुप्त मतदान पद्धतीच्या नियमांचा भंग केला आहे, असा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे.

    • Laxman Jagtap and Mukta Tilak: भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांनी गुप्त मतदान पद्धतीच्या नियमांचा भंग केला आहे, असा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं असून मतमोजणी सुरू होण्याच्या काही मिनिटं आधी काँग्रेसनं भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) व मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. या दोन्ही आमदारांनी गुप्त मतदान पद्धतीच्या नियमांचा भंग केला असून त्यांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

काँग्रेस पक्षानं निर्वाचन अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यात १९६१ च्या निवडणूक आचारसंहितेतील नियम ३७ (अ) व ४० (अ) चा दाखला देण्यात आला आहे. त्यानुसार मतदार हा आंधळा, अशिक्षित किंवा वृध्दापकाळामुळे असमर्थ असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या संमतीनं १८ वर्षांवरील वाचू शकणाऱ्या व्यक्तीची मतदानासाठी मदत घेता येते. पण इथं अशी परिस्थिती नव्हती. भाजपचे दोन्ही आमदार व्हीलचेअरवरून आले होते. त्यांनी स्वत: सही करून मतपत्रिका घेतली होती. मात्र, त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वतीनं मतपत्रिका मतपेटीत टाकली. त्यामुळं त्यांचं मत बाद केलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

काँग्रेसनं भाजप आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्यानं पाच वाजता सुरू होणारी मतमोजणी खोळंबली होती. मात्र, काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळून लावला आहे. राज्य निवडणूक आयोगानं आपला हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. त्यामुळं मतमोजणी काही वेळ खोळंबली आहे.