मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्र केसरीचा वाद संपेना.. आता पोलीस कॉन्स्टेबलने सिंकदर शेखच्या लढतीतील पंचांना दिली धमकी

महाराष्ट्र केसरीचा वाद संपेना.. आता पोलीस कॉन्स्टेबलने सिंकदर शेखच्या लढतीतील पंचांना दिली धमकी

Jan 16, 2023, 05:56 PM IST

  • Maharashtra kesari 2023 controversy : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियावरील वादानंतर आता एका पोलीस शिपायाने सिंकदर शेखच्या लढतीतील पंचांना फोनवरून धमकी दिली आहे.

महाराष्ट्र केसरीचा वाद संपेना

Maharashtra kesari 2023 controversy : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियावरील वादानंतर आता एका पोलीस शिपायाने सिंकदर शेखच्या लढतीतील पंचांना फोनवरून धमकी दिली आहे.

  • Maharashtra kesari 2023 controversy : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियावरील वादानंतर आता एका पोलीस शिपायाने सिंकदर शेखच्या लढतीतील पंचांना फोनवरून धमकी दिली आहे.

मुंबई -महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra kesari) स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्याचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत पंच असलेल्या मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचीधक्कादायक माहिती समोर आली आहे. सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाडला चार पॉइंट दिल्याने महाराष्ट्रभर वाद गाजत आहे. यामध्ये आपल्या मुलावर अन्याय झाल्याची भावना सिकंदरच्या वडिलांनी व्यक्त केली असून कोल्हापुरातील पैलवान व कुस्ती रसिकांनी सिंकदरवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर उपांत्यफेरीत पंचांनी पक्षपातीपणा केला नसता तर महाराष्ट्र केसरी विजेतेपदाचा निकाल वेगळाच लागला असता.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Wadettiwar : कसाबने नव्हे तर पोलिसांनी हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या', विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

त्याचबरोबर कोल्हापुरातील अनेक तालमीतील पैलवानांनी आरोप केला की, पुणेकरांनी आधीच ही स्पर्धा फिक्स केली होती. महाराष्ट्र केसरीचा विजेता शिवराज राक्षे ठरला असला तर सोशल मीडियावर सिंकदर शेख हिरो ठरला आहे. महाराष्ट्र केसरीत मातीच्या अंतिम फेरीत सिकंदरविरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव वादात अडकले आहेत. आता मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी फोन करून धमकी दिल्याचा दावा सातव यांनी केली आहे.

याप्रकरणी सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार अर्जकेला असून कोथरूड पोलिसांतही तक्रार करणार असल्याचे समजते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचांना धमकी देण्यात आली आहे. यावर मारुती सातव यांनी म्हटले की, पंचाना धमक्या मिळू लागल्या तर निर्णय कसे द्यायचे, मागील २० वर्षापासून पंचाचे काम करत आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे. आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सातव यांनी म्हटले की, महेंद्रने खालची टांग हा डाव सिकंदरवर लावला होता आणि सिकंदरसुद्धा डेंजर झोनमध्ये गेला होता. त्यामुळे महेंद्रला चार गुण दिले.

फोन करणाऱ्या पोलिसाने म्हटले की, तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की, तुमचा निर्णय योग्य होता. यावर सातव म्हणाले की,मी कुणावरहीअन्याय केला नाही.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा