मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deepak Kesarkar: मंत्रिपदासाठी दीपक केसरकर का ठरले एकनाथ शिंदे यांचे फेव्हरेट?

Deepak Kesarkar: मंत्रिपदासाठी दीपक केसरकर का ठरले एकनाथ शिंदे यांचे फेव्हरेट?

Aug 09, 2022, 12:34 PM IST

    • Deepak Kesarkar takes Oath as Minister: शिवसेना नेतृत्वाच्या विरोधातील बंडाच्या काळात एकनाथ शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडणारे दीपक केसरकर यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
Deepak Kesarkar (HT PHOTO)

Deepak Kesarkar takes Oath as Minister: शिवसेना नेतृत्वाच्या विरोधातील बंडाच्या काळात एकनाथ शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडणारे दीपक केसरकर यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

    • Deepak Kesarkar takes Oath as Minister: शिवसेना नेतृत्वाच्या विरोधातील बंडाच्या काळात एकनाथ शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडणारे दीपक केसरकर यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

Deepak Kesarkar takes Oath as Cabinet Minister: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात राज्यमंत्रीपद भूषवणारे दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. नव्या सरकारमध्ये त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. केसरकर यांचं ज्येष्ठत्व आणि शिवसेनेतील बंडाळीनंतर मीडियामध्ये अत्यंत शांतपणे व संयमीपणे एकनाथ शिंदे गटाची बाजू लढविल्याचं बक्षीस त्यानं मिळाल्याचं बोललं जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local: सीएसएमटी स्थानकाजवळ पुन्हा लोकलचा डबा घसरला, हार्बर लाईनची वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Navi Mumbai: धावत्या लोकलमधून तरुणाला खाली ढकललं, सायन रुग्णालयात उपचार सुरू

मानसिक धक्क्यामुळे पीडितेला लागले सेक्सचे व्यसन, अत्याचाराचे धक्कादायक प्रकरण पाहून हायकोर्टही हादरले

दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. १८ जुलै १९५५ रोजी जन्मलेल्या केसरकर यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असून त्यांनी एक्स्पोर्ट मॅनेजमेंट विषयाचा डिल्पोमा घेतला आहे. मराठी, हिंदीसह इंग्रजी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांच्या या भाषाप्रभुत्वाचा फायदा शिंदे गटाची बाजू राष्ट्रीय मीडियासमोर मांडताना झाला होता. केसरकर यांची युक्तिवादाची कला पाहून एकनाथ शिंदे हेच नव्हे तर, राज्यातील बडे नेतेही चक्रावले होते. त्यामुळंच शिंदे गटानं त्यांची अधिकृत प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे.

राजकीय प्रवास

मूळचे काँग्रेसी असलेले दीपक केसरकर हे तब्बल दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. त्यानंतर ९ वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष होते. सावंतवाडी नगरपरिषदेचं नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेत असल्यापासून जिल्ह्यात केसरकर हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते. राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असतानाही या दोघांमधील राजकीय वैर कायम होते. त्यामुळंच लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा प्रचार करण्यास केसरकर यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून २०१४ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००९ साली ते सर्वप्रथम राज्य विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ साली त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्या अर्थ, गृह व ग्रामविकास खात्याचं राज्यमंत्रिपद होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्याकडं होती. २०१९ सालच्या निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. मात्र, राज्यातील सत्ता समीकरणं बदलून महाविकास आघाडीच सरकार आलं. या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कामांत त्यांचा पुढाकार असतो. सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे ते कार्यकारी सदस्य आहेत. सावंतवाडी येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे ते उपाध्य आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवर ते सदस्य असून सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरता अभियानाचे अध्यक्ष आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत. सतत पाच वर्षे त्यांनी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा