मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur : कोल्हापूरच्या महालक्ष्मी चरणी भक्ताकडून ४७ तोळे सोन्याचा मुकूट अर्पण

Kolhapur : कोल्हापूरच्या महालक्ष्मी चरणी भक्ताकडून ४७ तोळे सोन्याचा मुकूट अर्पण

May 07, 2023, 12:19 AM IST

  • Kolhapur mahalakshmi : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला भक्तांकडून सुमारे ४७ तोळे सोन्यांचा रत्नजडित मुकूट अर्पण केला आहे. 

Kolhapur mahalakshmi

Kolhapur mahalakshmi : कोल्हापूरच्याकरवीर निवासिनी महालक्ष्मी देवीलाभक्तांकडून सुमारे ४७तोळे सोन्यांचा रत्नजडित मुकूटअर्पण केला आहे.

  • Kolhapur mahalakshmi : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला भक्तांकडून सुमारे ४७ तोळे सोन्यांचा रत्नजडित मुकूट अर्पण केला आहे. 

पंढरपूरच्या विठुराया चरणी जालन्याच्या एका महिला भाविकाने दीड कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केल्यानंतर आता कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला भक्तांकडून सुमारे ४७ तोळे सोन्यांचा रत्नजडित मुकूट अर्पण केला आहे. या मुकूटाची किंमत २४ लाख रुपये आहे. हे झगमगीत किरीट शनिवारी देवीला चढवण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला देशभरातील व खासकडून दक्षिणेतील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. जालना येथील एका अध्यात्मिक संस्थानने शुक्रवारी ४७० ग्राम वजनाचे शुद्ध सुवर्णजडित किरीट अर्पण करायचे ठरवले होते. यासाठी संस्थानचे पुजारी आणि काही पदाधिकारी शुक्रवारी किरीट घेऊन आले होते. या संस्थाच्या पुजाऱ्यांनी अंबाबाई देवीला मुकूटअर्पणदेवीचे दर्शन घेतले. किरटाची अंदाजे किंमत २४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मुकूट पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. समितीने साडी चोळी व प्रसाद देऊन या भाविकांचा सत्कार केला.

 

यापूर्वी कलकत्ता येथील एका भक्ताने ३२ लाख रुपये किमतीचा सोन्याचा किरीट अर्पणकेला होता. कराड येथीलअभिजीत पाटील यांनी पाच तोळे वजनाचे स्वर्ण किरीट गुरुवारी देवीला अर्पण केले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशीत ४७ तोळे सोन्याचे किरीट देवीला अर्पण झाले आहे,अशी माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा