मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur News : “अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी..”, कोल्हापूरच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Kolhapur News : “अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी..”, कोल्हापूरच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Jun 07, 2023, 04:25 PM IST

  • Devendra Fadnavis on Kolhapur incident : अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचा कोण प्रयत्न करतंय याचा तपास करावा लागेल. कुठलाही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis on Kolhapur incident

Devendra Fadnavis on Kolhapur incident : अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचा कोण प्रयत्न करतंय याचा तपास करावा लागेल. कुठलाही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही,असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

  • Devendra Fadnavis on Kolhapur incident : अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचा कोण प्रयत्न करतंय याचा तपास करावा लागेल. कुठलाही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis on Kolhapur : शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यावरून शहरात हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे ठिय्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. कोल्हापूर घटनेवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार; नशेखोर तरुणांकडून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचा कोण प्रयत्न करतंय याचा तपास करावा लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही याची काळजी घ्यावी' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या प्रकरणावर दिली.

आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरून कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाला परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत.

 

कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे,पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा कोणी हातात घेऊ नये कुठलाही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही,असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

 

दरम्यान जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा