मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Kandharkar : मुरुम तस्करांच्या डंपरनं पत्रकाराला उडवलं; संतापजनक घटनेमुळं नांदेडमध्ये खळबळ

Sanjay Kandharkar : मुरुम तस्करांच्या डंपरनं पत्रकाराला उडवलं; संतापजनक घटनेमुळं नांदेडमध्ये खळबळ

Mar 05, 2023, 04:25 PM IST

    • Nanded Crime News Marathi : दुचाकीवरून कंधारच्या दिशेनं जात असताना पत्रकार संजय कंधारकर यांना अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं धडक दिल्याची घटना समोर आली आहे.
Journalist Sanjay Kandharkar Accident In Nanded (HT)

Nanded Crime News Marathi : दुचाकीवरून कंधारच्या दिशेनं जात असताना पत्रकार संजय कंधारकर यांना अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

    • Nanded Crime News Marathi : दुचाकीवरून कंधारच्या दिशेनं जात असताना पत्रकार संजय कंधारकर यांना अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

Journalist Sanjay Kandharkar Accident In Nanded : कोकणातील रिफायनरीला विरोध करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेडमध्ये अवैध मुरुमची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत आणखी एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नांदेडमधील कंधार तालुक्यातल्या पत्रकार संजय कंधारकर यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला असून त्यानंतर आता या अपघाताची चौकशी करण्याची मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे. शशिकांत वारिसे यांच्या अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एका पत्रकाराचा अपघातात मृत्यू झाल्यामुळं नांदेडसह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार संजय कंधारकर हे काही कामानिमित्त लोहा शहरातून कंधारच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी अवैध मुरुमची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं त्यांना धडक दिली. त्यानंतर आरोपी डंपरचालकानं घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. अपघात झाल्याचं कुणाच्याही लक्षात न आल्यामुळं संजय कंधारकर हे तासभर जखमी अवस्थेत घटनास्थळीच पडून होते. त्यानंतर घटनास्थळावरून जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यानंतर स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी कंधारकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळं आता या घटनेमुळं नांदेडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीच्या राजापुरमध्ये पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातही पत्रकार संजय कंधारकर यांना अवैध मुरुमची वाहतूक करणाऱ्या डंपरनं धडक दिल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता राज्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याशिवाय संजय कंधारकर यांचा अपघात आहे की घातपात, याची चौकशी करण्याचीही मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं केली आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.