मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना पदोन्नती, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती

Rashmi Shukla : रश्मी शुक्ला यांना पदोन्नती, सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती

Mar 02, 2023, 09:37 PM IST

  • Rashmi Shukla promotion : फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलच्या महासंचालकपदी  पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी पत्र जारी केले आहे. 

Rashmi Shukla

Rashmi Shukla promotion : फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनासशस्त्र सीमादलच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी पत्र जारी केले आहे.

  • Rashmi Shukla promotion : फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलच्या महासंचालकपदी  पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी पत्र जारी केले आहे. 

Rashmi Shukla Phone Tapping Case : राज्यात प्रचंड गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांचा सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदाचा कार्यकाळ ३० जून २०२४ पर्यंत असणार असल्याचे केंद्र सरकारच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

रश्मी शुक्ला शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांना बढती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालपदी करण्यात आली आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते.

काय आहे फोन टॅपिंग प्रकरण ?

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता.

या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा