मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jamner : गुजरात जिकलं पण जामनेरमध्ये मुलीचा पॅनल पराभूत; सीआर पाटलांना मोठा धक्का

Jamner : गुजरात जिकलं पण जामनेरमध्ये मुलीचा पॅनल पराभूत; सीआर पाटलांना मोठा धक्का

Dec 20, 2022, 10:59 AM IST

    • Bhavini CR Patil Panel : गुजरातमध्ये भाजपचे हिरो ठरलेले प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे.
CR Patil (HT)

Bhavini CR Patil Panel : गुजरातमध्ये भाजपचे हिरो ठरलेले प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे.

    • Bhavini CR Patil Panel : गुजरातमध्ये भाजपचे हिरो ठरलेले प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे.

Bhavini Patil Panel Jamner Jalgaon : गुजरातमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयाचे शिल्पकार ठरलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा जळगावातील जामनेरमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळं सीआर पाटील यांना महाराष्ट्रात मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांची मुलगी भाविनी पाटील यांचा मोहाडी ग्रामपंचायतच्या सदस्यपदी विजयी झाल्या मात्र, त्यांच्या पॅनलचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यामुळं आता भाजपला गुजरातमध्ये विजय मिळवून देणाऱ्या सीआर पाटलांच्या मुलीच्या पॅनलचा महाराष्ट्रात पराभव झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : अमरावतीत ऑरेंज अलर्ट; राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

मिळालेल्या माहितीनुसार, सीआर पाटलांच्या कन्या भाविनी पाटील यांनी जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वत:चं त्यांचं ग्राम विकास पॅनल उभं केलं होतं. या पॅनलला गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु आज ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या पॅनलला दहापैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलनं दहापैकी सात जागा जिंकत लोकनियुक्त सरपंचपदासह मोहाडी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केली आहे.

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या मोहाडी ग्रामपंचायत निवडणूक लढवत असल्यानं त्याकडे जळगाव जिल्ह्यासह गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचं लक्ष लागलेलं होतं. परंतु भाविनी पाटील यांचा विजय झालेला असला तरी त्यांच्या पॅनलला मात्र पराभव पत्करावा लागला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा