मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : पुणे हादरले ! वाघोलीत प्रेयसीनं भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराला भोसकलं; कारण अस्पष्ट

Pune murder : पुणे हादरले ! वाघोलीत प्रेयसीनं भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराला भोसकलं; कारण अस्पष्ट

May 29, 2023, 03:08 PM IST

    • Pune wagholi murder : पुण्यात वाघोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून एका प्रेयसीने आपल्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली.
Thane crime news

Pune wagholi murder : पुण्यात वाघोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून एका प्रेयसीने आपल्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली.

    • Pune wagholi murder : पुण्यात वाघोली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून एका प्रेयसीने आपल्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली.

पुणे : प्रेमप्रकरणातून प्रेयसीने आपल्याच प्रियकराचा घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

यशवंत महेश मुंडे (वय २०) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुजा महेश पणाळे असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसांपासून वाघोली परिसरात भाड्याची खोली घेऊन राहत होते. काही दिवस दोघे व्यवस्थित राहिले. मात्र, आज दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

याच वादातून प्रेयसीने प्रियकराची घरातील भाजी चिरण्याच्या चाकुच्या साह्याने वार करून त्याचा खून केला. प्रियकराचा मृतदेह खोलीतच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

 

दोघांच्या भांडणात प्रेयसीही जखमी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा