मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire : पुण्यातील कल्याणीनगर आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग, अनेक कर्मचारी अडकले

Pune Fire : पुण्यातील कल्याणीनगर आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग, अनेक कर्मचारी अडकले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 29, 2023 01:28 PM IST

pune kalyaninagr IT Park fire : कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे आगीची घटना घडली असून अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेट. इमारतीत गच्चीवर अडकलेल्या ४० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

Pune Fire
Pune Fire

पुणे : पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे आयटी कंपनीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली असून यात अनेक कर्मचारी अडकले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो शिडीच्या साह्याने ४० कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

Pune fire : पुण्यात मार्केटयार्डमधील कागद-पुठ्ठा गोडाऊनला भीषण आग

पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी मार्केट यार्ड या ठिकाणी आगीची घटना ताजी असतांना पुन्हा कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली असून अनेक कर्मचारी या इमारतीत अडकले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहनांचा वापर करत इमारतीत गच्चीवर अडकलेल्या ४० कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. या इमारतीत आणखी काही नागरिक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Jejuri: जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला; आज आंदोलनाचा चौथा दिवस, ग्रामस्थ घेणार अजित पवारांची भेट

दरम्यान, ही आग कशी लागली याची माहिती मिळूशकली नाही. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इमारती बाहेर बघ्याची गर्दी झाली आहे. वृत्त लिहेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.

 

दरम्यान, आज पुण्यातील मार्केटयार्ड येथील कागद/पुठ्ठा गोडाऊनला मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली. हा घटनेत गोडाऊनमधील मोठा माल जळून भस्मसात झाला. अग्निशामक दलाच्या ९ बंब आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले.

IPL_Entry_Point

विभाग