मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Crime : तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; गुन्हा दाखल

Nanded Crime : तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; गुन्हा दाखल

Jan 23, 2023, 01:59 PM IST

    • Nanded Suicide News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded Crime

Nanded Suicide News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Nanded Suicide News: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तर आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : येथील मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात एका तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे. मुदखेड पोलिसात आरोपी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार ऋतुजा प्रकाश शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे तर उद्धव भाऊराव शिंदे असे छेडछाड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ऋतुजा प्रकाश शिंदे हिला उद्धव भाऊराव शिंदे हा नेहमी त्रास देत होता. रस्त्याने जाता-येता उद्धव शिंदे वारंवार अश्लील चाळे आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायचा. याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केल्यानंतरही आरोपीने त्रास देणे सुरच ठेवले.

अखेर तरुणीने बदनामीच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतुजाने उद्धव याचे घर गाठून त्याच्या आई-वडिलांना मुलाला समज देण्याबाबत सांगितले. त्याच्या आईने आणि वडिलांनी समजून सांगूनही उद्धव हा तिला त्रास द्यायचा अखेर बादमीच्या भीतीने ऋतुजाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. प्रकाश शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी मुदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऋतुजाने टोकाचे पाऊल उचलल्याने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशा प्रकारे कुणी त्रास देत असेल तर थेट पोलिसांची संपर्क साधावा असे आवाह करण्यात आले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा