मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bal shaurya purskar 2023 : नांदेडच्या लक्ष्मी येडलेवारला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर

Bal shaurya purskar 2023 : नांदेडच्या लक्ष्मी येडलेवारला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 16, 2023 10:50 PM IST

national child bravery award : नांदेडच्या लक्ष्मी येडलेवार यांना यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. विजेच्या शॉक लागलेल्या भावाचा तिने जीव वाचवला होता.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

National child bravery award :  अतुल्य शौर्य दाखवणाऱ्या बालकांना दिला जाणारा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार यंदा नांदेड जिल्ह्यातील लक्ष्मी आनंदा येडलेवार या मुलीला जाहीर झाला आहे. लक्ष्मी बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात राहते. लक्ष्मीला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. तिने विजेचा शॉक लागलेल्या आपल्या भावाचा जीव वाचवला होता. लक्ष्मी येडलेवार खतगावच्या सौ. मंजुळाबाई हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे.

महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीच्या शिफारशीनुसार भारतीय बालकल्याण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

आनंदा तुकाराम येडलेवार यांची लक्ष्मी ही तिसरी मुलगी आहे. तिने २१ सप्टेंबर २०२१ रोजी तिचा चुलत भाऊ आदित्य येडलेवार याचा जीव वाचवला होता. आदित्यला विजेचा शॉक लागला होता. त्यावेळी आपले प्राण धोक्यात घालून तिने भावचा जीव वाचवला होता. 

घराच्या अंगणात खेळताना लक्ष्मीचा चुलत भाऊ आदित्यचा विजेच्या तारांना स्पर्श झाला होता व तो विद्युत प्रवाहित तारांना चिटकला होता. यावेळी तिने प्रसंगावधान राखत व मोठ्या धाडसाने  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या भावाचा जीव वाचवला होता. 

IPL_Entry_Point

विभाग