मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  घरातून बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा विवस्त्रावस्थेत आढळला मृतदेह

घरातून बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा विवस्त्रावस्थेत आढळला मृतदेह

Aug 11, 2022, 07:22 PM IST

    • खेड तालुक्यात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय चिमुकलीचा विवस्त्र व छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
चिमुकलीचा आढळला मृतदेह

खेड तालुक्यात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय चिमुकलीचा विवस्त्र व छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

    • खेड तालुक्यात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षीय चिमुकलीचा विवस्त्र व छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

पुणे (चाकण) – खेड तालुक्यात एका चार वर्षीय चिमुकलीचा विवस्त्र व छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मेदनकरवाडी ( ता.खेड ) गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. चार वर्षीय चिमुकली एक दिवस आधी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. रिशु ठाकूर असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे कुटूंब मुळचे बलिया उत्तरप्रदेशमधील आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघी बहिणी घरात झोपलेल्या असताना रिशु ही चिमुकली कोणाला न सांगता दुपारी  दोनच्या दरम्यान घराबाहेर पडली. काही वेळानंतर तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. 

आज (गुरुवारी) सकाळी कंपनीत कामावर जाणाऱ्या लोकांना एका लहान मुलीचा विवस्त्र अवस्थेत असलेला मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत दिसून आला. त्यानंतर याची सूचना स्थानिक नागरिकांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करून चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 

घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा