मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची संजय राऊत व आदित्य ठाकरेंशी झाली होती खडाजंगी

दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची संजय राऊत व आदित्य ठाकरेंशी झाली होती खडाजंगी

Jun 22, 2022, 12:37 PM IST

    • एकनाथ शिंदे यांना पक्षांतर्गत वाईट वागणूक मिळत असल्याने ते नाराज होते अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिंदे यांचे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या सोबत वाद झाल्याचे समजते.
एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, संजय राऊत

एकनाथ शिंदे यांना पक्षांतर्गत वाईट वागणूक मिळत असल्याने ते नाराज होते अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिंदे यांचे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या सोबत वाद झाल्याचे समजते.

    • एकनाथ शिंदे यांना पक्षांतर्गत वाईट वागणूक मिळत असल्याने ते नाराज होते अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिंदे यांचे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्या सोबत वाद झाल्याचे समजते.

Maharashtra political crises मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजींची संख्या होती. एकनाथ शिंदे यांना योग्य वागणूक दिली जात नव्हती. विधानपरिषदेच्या निवडणूकीदरम्यान त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रवेश दिला गेला नव्हता यामुळे शिंदे यांची नाराजी वाढली होती. दोन दिवसांपूर्वीच एकथान शिंदे यांचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर वाद झाल्याचे उघड झाले आहे. याच वादामुळे यांनी बंडाळीचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

विधान परिषदेच्या निवडणुकीच्याआधी पवईमधील रिनायसन्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. याचवेळी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांसोबत शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मते काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन या नेत्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेची मते ही काँग्रेसला द्यायची नाही अशा पावित्र्यात एकनाथ शिंदे होते.

मात्र, याला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी विरोध केला. यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ही घटना या बंडाळीचे तात्कालीक कारण असू शकते अशी माहिती एका बड्या राजकीय इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना सांगिलते.

शिवसेनेत अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली होती. ते राज्य सरकारच्या कारभारावर नाराज होते. एकथान शिंदे हे सुद्धा नाराज होते. त्यांनी सर्व नाराज उमेदवारांच्या गटाचे नेतृत्व केले. या सर्वांची नाराजीची माहिती ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कल्पना देण्यात आली होती.