मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेला दुसरा धक्का; कालपर्यंत सोबत असलेले मंत्री गुलाबराव पाटीलही 'गुल'

शिवसेनेला दुसरा धक्का; कालपर्यंत सोबत असलेले मंत्री गुलाबराव पाटीलही 'गुल'

Jun 22, 2022, 12:02 PM IST

    • Gulabrao Patil Turns Rebellion: शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील निष्ठा बदलत एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश मिळवल्याची चर्चा आहे.
Gulabrao Patil

Gulabrao Patil Turns Rebellion: शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील निष्ठा बदलत एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश मिळवल्याची चर्चा आहे.

    • Gulabrao Patil Turns Rebellion: शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील निष्ठा बदलत एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश मिळवल्याची चर्चा आहे.

Gulabrao Patil not Reachable: एकनाथ शिंदे यांचं बंड शमविण्यात अपयश आलेल्या शिवसेनेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कालपर्यंत शिवसेनेच्या सोबत असलेले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला उपस्थित असलेले मंत्री गुलाबराव पाटील हे देखील नॉट रिचेबल झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर काही आमदारांना घेऊन ते सुरतला रवाना झाले होते. मात्र, १५ ते २० आमदार मुंबईतच होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला हे आमदार हजर होते. त्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश होता. त्यामुळं ते शिवसेनेसोबतच असल्याचं बोललं जात होतं. मुंबईतील बैठकीनंतर काल ते जळगावला रवाना झाले होते. मात्र, आता तेही संपर्काबाहेर गेले आहेत.

गुलाबराव पाटील यांनी आपल्या काही समर्थकांना व जवळच्या व्यक्तींना मोबाइलवरून 'जय महाराष्ट्र' असा संदेश पाठवल्याचं समजतं. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. ते देखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाल्याचं समजतं.

गुलाबराव पाटील यांची ओळख शिवसेनेची धडाडती तोफ अशी आहे. एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेनेनं त्यांना जिल्ह्यात राजकीय ताकद दिली होती. तीन पक्षांचं सरकार असतानाही त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं होतं. त्यानंतरही त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. शिवसेनेसाठी जबर हादरा असल्याचं मानलं जात आहे.